यवतमाळ जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून नेर तालुक्यातील मोझर आणि पिंपळगाव या गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील पाईप वाहून गेले असून सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.