शासकीय नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. महसूल आणि वन विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत तब्बल 70 लाख रुपये उकळल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रे, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के आणि लेटरहेड जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास सुरू आहे