Eknath Shinde यांचं 'Operation Tiger' लांबणीवर?, Thackeray गटाचे खासदार फोडण्यात अपयश? | NDTV मराठी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याची चर्चा होत होती. तुर्तास तरी हा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसत नाहीए. ठाकरेंच्या सेनेचे 9 खासदार आहेत. तेव्हा नवीन गट म्हणून मान्यतेसाठी दोन तृतीयांश खासदार म्हणजेच 9 पैकी 7 खासदार वळवणं शिंदेंच्या सेनेला भाग आहे. मात्र तो आकडा गाठण्यात आतापर्यत शिंदेंच्या सेनेला यश आल्याचं दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ऑपरेशन टायगर लांबणीवर बोललं जातंय.

संबंधित व्हिडीओ