उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना तीन विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये ब्रिटिश संसदेच्या 'हाऊस ऑफ लॉर्डस् मध्ये शिंदे यांचा 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' या पुरस्कारासोबतच 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये आयोजित 'इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे.
Eknath Shinde to be honoured with three awards in the British Parliament; what is Naresh Mhaske's reaction?