चाळीसगावात पुराचा कहर! मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरात नदी-नाल्यांना पूर आला आहे. रमाबाई आंबेडकर नगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात तब्बल १० ते १५ सर्प बाहेर पडले. एका युवकाला सर्पदंश झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.