जगात पुराचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीए. भारतात मौसमी पावसामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे चीन, अमेरिका, युरोप, आफ्रिका अशा साऱ्यात खंडांमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय. अलिकडेच दक्षिण चीनमध्ये व्हिएतनाम, दक्षिण चीनमध्ये विफा चक्रीवादळानं धुमशान घातलं. तर अमेरिकेत जून-जुलैदरम्यान आलेला पूर ओसरत नाही तोच पुन्हा तिथं पूरस्थिती निर्माण झालीय. तर आफ्रिकेतही वेगळी स्थिती नाही. इथियोपिया देशातही पुरानं कहर केलाय. पाहूया जगात पुन्हा कुठे कुठे पुराचा तडाखा बसलाय.