Chh.Sambhajinagar मध्ये शिक्षकाच्या हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक;दानवेंकडून पोलिसांच्या भूमिकेवर टीका

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मारहाणीत एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली.वेरुळ इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे शिक्षक बोरसे यांना कामात अडथळा आला म्हणून कारमधून आलेल्या व्यक्तींनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा गुन्हा गुरुवारी उशिरा रात्री दाखल करण्यात आला. शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे यांनी या अनुषंगाने तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा म्हणून नातेवाईकांसह अंबादास दानवेंनी रस्ता रोको आंदोलन केले होते.दरम्यान, अंबादास दानवेंनी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांच्या भूमिकेवर टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ