वसईच्या कळम समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी उत्साहाच्या भरात आपली कार थेट समुद्राच्या पाण्याजवळ नेली. आणि भरतीमुळे ही कार वाळूत अडकली. सुदैवाने, स्थानिक रहिवासी आणि आसपासच्या दुकानदारांनी तात्काळ धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळलीय. पर्यटक किनाऱ्यावर सागरी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच समुद्राला भरती सुरू झाली आणि बघता बघता कारची चाकं वाळूत रुतत गेली.. त्याचबरोबर लाटांच्या तडाख्यामुळे कार समुद्राच्या दिशेने ओढली जाण्याची भीती होती. त्यामुळे काही काळ तिथे गोंधळ उडाला. पण घटनेचे गांभीर्य ओळखून किनाऱ्यावरील स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि इतर काही पर्यटकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.