नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून सुखरूप सुटका केलीय. मोबाईलवर Free Fire गेम खेळताना विद्यार्थिनीची ओळख उत्तर प्रदेशातील एका 18 वर्षीय तरुणाशी झाली होती. या तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रलोभन दाखवून सीतापूरला बोलावले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.