NEET Paper Leak Case|न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास, Shivraj Motegaonkar चा भाऊ राजू मोटेगावकर NDTV वर

शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचा सराव पेपर पुन्हा सुरू झालेला आहे.. या विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा नियमितपणे होणार असल्याचं मोटेगावकरच्या भावाकडून स्पष्ट करण्यात आलं.. कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सराव परीक्षा नियमितपणे घेणार आहेत.. त्याचबरोबर हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे यावर आम्ही भाष्य करणार नाहीत असं सांगत संपत्तीच्या ज्या चर्चा होत आहेत त्याबद्दल विचारला असता सर्व व्यवहार क्लिअर असल्याचे देखील मोटेगावकर यांच्या भावाकडून स्पष्ट करण्यात येत आहे तर दरम्यान, परिवारातील कुठल्याही सदस्याची अजून पर्यंत चौकशी झाली नाही आणि चौकशीला बोलवलं नसल्याचे देखील मोटेगावकर यांचा मोठा भाऊ राजू मोटेगावकरने स्पष्ट केले... यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी.

संबंधित व्हिडीओ