सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या वादावर अखेर पडदा पडलाय. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली. सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद सभागृहात दिसू नये अशी भूमिका घेण्यात आली. शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची समन्वयकाची शिष्टाई पार पाडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत आणि चंद्रशेखर बावनकुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक करतायत.