आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटताना दिसत आहेत. बीड शहरात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा संपल्यामुळे वाहनचालकांची काही मोजक्या पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पेट्रोल-डिझेल घेऊन येणारे टँकर वेळेत बीडमध्ये पोहोचू शकले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरती ही टंचाई निर्माण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान आज रात्रीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे टँकर बीडमध्ये दाखल होणार असून उद्यापासून इंधनाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होईल, अशी माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापकांनी दिली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी