Satara ZP वादावरून Shinde गट-BJP आमनेसामने, पोलीस अधीक्षक तुषार दोषींच्या निलंबनावरून राडा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत झालेला राडा आज विधानसभेत पोहोचला.शिंदे गटाचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करण्याची मागणी केली.यानंतर विधान परिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तुषार दोषींच्या निलंबनाचे आदेश दिले, यानंतर निलंबनाचे आदेश मागे घेण्याची विनंती भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरेंनी केली.यानंतर हा वाद विधानसभेत देखील पोहोचला, यावेळी एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा उचलताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन शिंदे गटाच्या मंत्र्यांना दिलीय.. तर निलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे दिलेले आदेशाला सभापती राम शिंदे यांनी स्थगिती दिलीय,

संबंधित व्हिडीओ