Global News| डॉमिनिक रिपब्लिकमध्ये छत कोसळून भीषण अपघात, तब्बल 98 जणांचा मृत्यू; 160 जण जखमी

डॉमिनिक रिपब्लिकमध्ये छत कोसळून भीषण अपघातात तब्बल ९८ जणांचा मृत्यू झालाय.तर १६० जण जखमी झालेत.मेरेंग्यू संगीत कार्यक्रमात ही दुर्घटना घडली. यावेळी अनेक राजकारणी, क्रीडापटू आणि इतरही नागरिक उपस्थित होते.बुधवारी रात्री ही घटना घडली. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. दरम्यान अद्याप या अपघाताचं कारण स्पष्ट झालेलं नाही. तर मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांनी शवागाराबाहेर एकच गर्दी केली. जेट सेट या नाईटक्लबमध्ये मरेंग्यू संगीत कार्यक्रम सुरू होता.हा क्लब हा सँटो डॉमिनिगो मधील एक प्रतिष्ठित क्लब आहे. गेले ५० वर्ष तो सुरु आहे. जेट सेट मंडेज हा तिथला स्थानिक कलाकार आणि आतंरराष्ट्रिय कलाकारांना एकत्र आणणारा कार्यक्रम विशेष प्रसिद्ध आहे.

संबंधित व्हिडीओ