इस्रायलमध्ये युद्धाच्या सावटाखाली निवडणुका झाल्या. संसदेचा संपूर्ण कार्यकाळ संपल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खरंतर यंदा विक्रमी मतदान झालं. तरी सर्वच पक्ष आणि आघाड्या 61 या जादुई आकड्यापासून दूरच राहिल्या. त्यातही नेतान्याहू आणि उजव्या विचारसरणीच्या आघाडीनं ५३ जागांसह आघाडी घेतलीय. तर माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वातील विरोधी गटानं ४८ जागा मिळवल्यात. तर अल्पसंख्याक अरब पक्षांनी १९ जागा मिळवल्यानं ते किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. पाहूया इस्रायलमधील सत्तेची गणितं कशी जुळणार आणि त्याचा पश्चिम आशियातील तणावावर कसा परिणाम होणार?