MLA Sanjay Gaikwad यांची बेताल वक्तव्य कधी थांबणार ? Eknath Shinde गायकवाडांवर काय कारवाई करणार ?

शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांची जीभ पुन्हा घसरलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.. पण गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीए. 'जो शेतकरी आत्महत्या करेल, त्याच्या मयताला जाऊ नका, त्याच्या मृतदेहाला जनावरं खातील तेव्हा कळेल, असं वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं... दरम्यान, माझ्या शब्दाचा विपर्यास केला,...कुणाचं मन दुखावलं असल्यास दिलगिरी व्यक्त करतो,..अशी भूमिका आता संजय गायकवाडांनी घेतलीय

संबंधित व्हिडीओ