विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीमधला अंतर्गत संघर्ष अजुनही संपत नाहीये.. शिवसेनेच्या विरोधामुळे आपला पराभव झाल्याची सल भाजपच्या मनात आहे.. यावरून नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. याच टीकेला उत्तर देण्यासाठी आता निलेश राणे पुढे आलेत. त्यांनी नवनाथ बन यांनी लायकीत बोलण्याचा सल्ला दिला.. यावर निलेश राणे माझे मित्र असल्याची सारवासारव नवनाथ बन यांनी केली.. तेव्हा बन माझे मित्र नसून ज्युनिअर असल्याचं ठणकावून सांगितलं.