एकमेकांचे कट्टर शत्रू... दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्यापासूनच जोरदार युद्ध... अलिकडच्याच काळात म्हणजे मे महिन्यातच दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष.. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांची ही अगदी थोडक्यात ओळख... मात्र हे दोन शत्रू त्यांच्या एका समान मित्रासाठी एकत्र आलेत. तो मित्र म्हणजे अफगाणिस्तान.... आणि हे दोघं एकत्र येण्याचं कारण ठरलेत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.. त्यांनी अलिकडेच अफगाणिस्ताननं त्यांचं बगराम हवाई तळ अमेरिकेला देऊन टाकावा नाहीतर परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिली.अर्थातच तालिबान यासाठी तयार नाही. आणि त्याच्या या भूमिकेचं भारत आणि पाकिस्ताननंही समर्थन केलंय. पाहूया नेमकं काय घडतंय