अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या राज्य सरकारच्या मोठ्या पॅकेजमधून हिंगोलीचे दोन तालुके वगळल्याने शेतकरी संघटना आक्रमक. गोरेगाव येथे आंदोलकांनी नोटा उधळून तुटपुंजी मदत परत घ्या, अशी घोषणाबाजी करत सरकारला जाब विचारला.