सचिन घायवळ शस्त्र परवाना शिफारसपत्राच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुक्तगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. 'उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून शिफारसपत्र दिले' या रामदास कदमांच्या खळबळजनक खुलाशानंतर ही भेट महत्त्वाची आहे.