अक्षय तृतीयेनिमित्त जळगाव सुवर्णनगरी हे पारंपारिक दागिन्यांनी फुलले असून ग्राहकांमध्येही पारंपारिक दागिने खरेदी करण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या अनुषंगाने जळगाव सुवर्णनगरीत राणी हार, चपला हार, कोल्हापुरी साज, नथ, ठुशी असे विविध पारंपरिक दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध झालेत.याबाबत जळगाव सुवर्णनगरी मधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.