नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानचा शोध घेत पोलिसांचं पथक ठाण्याच्या मुंब्रा परिसरात पोहोचलं होतं.मात्र एसआयटी पथक येणार असल्याची माहिती मिळताच निदा खान पसार झाल्याचं समोर आलंय. दरम्यान, अटक टाळण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय.पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.