Ahilyanagar| झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या, राजेंद्र गडगेवर गुन्हा दाखल

मंत्राने कॅन्सर बरा करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे महाराजाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगावपानमध्ये दत्तधाम सरकार नावाने हा स्वयंघोषीत महाराज आश्रम चालवतो.श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करण्याचा आरोप त्याच्यावर होता. झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या राजेंद्र गडगेविरोधात अंनिसने आक्रमक पवित्रा घेतला होता. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांच्या तक्रारीवरुन राजेंद्र गडगेच्या मुलीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ