विक्रोळीमधील कुख्यात ड्रग्स तस्कर मोहम्मद तस्वर यासिन कुरेशी याच्या जिमवरील तोडक कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरुय. ड्रग्स प्रकरणात आरोपीचे कंबरडे मोडण्यासाठी मुंबई पोलिसांचा योगी पॅटर्न बघायला मिळालाय. गोरेगाव ड्रग्स प्रकरणांनंतर पोलीस आणि प्रशासन मुंबईमधील ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळताना दिसत आहे. तस्सू हा मुंबई उपनगरातील कुख्यात ड्रग्स तस्कर आहे. सध्या तो तडीपार आहे. याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.