Women's Reservation Bill | पराभवातही महिला आरक्षणात BJP बाजीगर? BJP ने आरक्षणाचा डाव का टाकला?

महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलेले 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालेय.गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मांडलेले कोणतेही घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात नामंजूर झाले आहे.54 मतांच्या कमतरतेमुळे विधेयक फेटाळलं गेलं..सभागृहात दोन दिवसांच्या चर्चेनंतर शुक्रवारी संध्याकाळी मतदान झालं. संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्यात दुरुस्ती आणि डिलिमिटेशनशी संबंधित विधेयकांच्या समर्थनार्थ 298 मतं पडली, तर विरोधात 230 मतं पडली. दरम्यान त्यानंतर भाजप रस्त्यावर उतरलीय. देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेसविरोधात भाजपची आंदोलनं सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ