Thackeray Brother's | Raj Thackeray यांच्या उपस्थितीत MNS ची बैठक तर Thackeray गटाचा निर्धार मेळावा

निवडणूक यादीतील घोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड आक्रमक झालेत... आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक होणार आहे... या बैठकीला मनसे नेते आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.. निवडणूक यादीतील घोळाप्रकरणी मनसेने शिवतीर्थवर ही बैठक बोलावलीय.. थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे.. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटी आणि यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतील समस्यांवर चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.. शिवाय 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत पण चर्चा होणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा NSCI डोम वरळी येथे संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे... या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आमदार, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचसोबत मुंबईतील मतदार यादीच्या घोळाबाबत आदित्य ठाकरे सादरीकरण करणार आहेत. येत्या एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा मोर्चा आहे...

संबंधित व्हिडीओ