पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबर केलेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखले यांनी घेतला आहे.जैन बोर्डिंगच्या जागेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला होता.शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता.रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग व्यवहारावरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केल होते.दरम्यान मुघलांना पुणेकरांनी थोपवलं असं म्हणत,रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावलाय. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय पलटवार केलाय.