आरोपी PSI गोपाळ बदनेला 30 ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.डॉक्टर महिला मृत्यूप्रकरणी बदनेला ही पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फलटणच्या डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांच्या कोर्टाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, आरोपीचे वकील ॲड. राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तिवाद करत आरोपी बदने याला 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला मात्र कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.