भाजपा आमदार परिणय फुके यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. तर आता महायुतीमधील शिंदे गट देखील स्वबळाची तयारी करीत आहे. भाजपच्या डोक्यात काहीना काही असते म्हणून आम्ही पूर्व तयारी केली आहे अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी दिलीए... भंडारा गोंदिया जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर लढणार आहे. तशी तयारी देखील केली आहे असं भोंडकर म्हणाले... मात्र येणाऱ्या मित्र पक्षांनी आपली पातळी सोडून नये कारण समोर पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. तेंव्हा तुम्हाला आमची गरज लागणार आहे असा इशाराही त्यांनी भाजपला दिला