केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपाच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार आहे.. दिल्लीतल्या भाजपच्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईत चर्चगेटमध्ये सुसज्ज असं भाजप कार्यालय उभारलं जाणार आहे.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत.. पक्षाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी ही नवी इमारत सुसज्ज असेल...