दिवाळी गोड व्हावी म्हणून सरकारच्या लाडक्या बहिणी सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारकडे मात्र निधीची चणचण असल्याचं दिसतंय. कारण, पुन्हा एखदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याची वेळ सरकारवर आलीय. त्यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय. तर सरकारमधील मंत्र्यांनी लंगडं समर्थन केलंय. दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं 31 हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलंय. त्यासाठी पैसा आणणार कुठून? असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. त्यामुळे सरकार निधीच्या चणचणीवर कशी मात करणार? हा प्रश्न उपस्थित होतो.. पाहूया एक रिपोर्ट