Ground Report| अहमदाबाद विमान दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, काळ पुढे सरकला… पण जखमा तशाच राहिल्या…

अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे…एक अशी दुर्घटना, ज्याने देश हादरला होता आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य क्षणार्धात बदलून टाकलं होतं.या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्या काळात बचावकार्य, प्रशासनाची धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश हे सगळं दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर ताजं आहे.या घटनेनंतर विमान सुरक्षा, तांत्रिक तपासणी आणि एव्हिएशन क्षेत्रातील नियमांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या.तपास यंत्रणांनी दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला, तर पीडित कुटुंबांना न्याय आणि मदतीची मागणीही जोर धरू लागली.दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत असताना मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ