Pune तील जुन्नरमध्ये गारपीट, Chh.Sambhajinagar च्या सिल्लोडमध्ये अवकाळी पाऊस; शेतकरी चिंतेत

पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झालीय.. या गारपिटीने आंबा आणि द्राक्ष पिकाचे नुकसान होणार आहे.. या परिसरात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू असून मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने काढलेला कांदा सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करताय..छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे जोरदार पावसाला सुरुवात झालीय... मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे.

संबंधित व्हिडीओ