राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. रायगड-महाडमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे महाड-पोलादपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली. दुसरीकडे रत्नागिरीतही आज ऑरेंज अलर्ट आहे.रत्नागिरीत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 59.46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.जालन्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे.वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वनोजा गाव परिसरात मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे.त्यामुळे वनोजा गावच्या जिल्हा परिषदेतील शाळेसमोर पाणी साचलंय.बीडमध्ये मुसळधार पावसामुळे बिंदूसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी वाढतेय.