अकोल्यात 'हिट अँड रन'चा थरार पाहायला मिळाला. अकोल्यातील 'हिट अँड रन'च्या अपघाताची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.कार चालकाने एका दुचाकीला तब्बल दीड किमीपर्यंत फरफटत नेलं.अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील जिल्हा परिषद शाळेसमोर हा संपूर्ण थरार घडला.इतकेच नाही तर त्याने पुढे चार ते पाच दुचाकी वाहनांना धडक दिली.या अपघातात दोन पेक्षा जास्त जण जखमी झाले. दरम्यान संतप्त नागरिकांनी या कारचा चालकाला बेदम चोप दिलाय.. दीड किमी अंतरावर नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करून त्यानंतर अखेर कारचालक हा नागरिकांच्या तावडीत सापडला आणि नागरिकांनी थेट गाडीची तोडफोड केली.. या तोडफीडीत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्यात, त्यासोबतच कार चालकाला बेदम चोप दिलाय.