आता राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पीडितेने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली नसती, तर रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला असता, असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. नायगाव स्थानकासह महिलांच्या डब्यात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली