रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्यांविरोधात Mumbai Police यांची कारवाई, 82 गुन्हे दाखल, 110 जणांना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ५ ते १० नोव्हेंबरदरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये 82 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 110 जणांना नोटीस बजावण्यात आलीय. सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते, गल्ली आणि पदपथांवर फटाके फोडण्यास वर्षभराची बंदी घातली होती. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ