पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिककरांना गॅस दरवाढीचा झटका बसणार आहे. महानगर नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात वाढ जाहीर केली आहे.
आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया २५ पैशांची वाढ करण्यात आली असून नवीन दर ९९ रुपये ७५ पैसे झाला आहे. तर पीएनजीच्या दरात प्रति एससीएम १ रुपया ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.