जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील तणाव अद्याप कायम असल्याचं चित्र आहे. महायुतीच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात झालेल्या गुप्त चर्चेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यानंतर गुलाबराव पाटील यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्याशीही चर्चा केली. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत का, याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आलंय...