पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी संस्थेच्या सात महाविद्यालयांवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. या महाविद्यालयांचे व्यवस्थापन पुढील तीन वर्षांसाठी शासनाच्या ताब्यात राहणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच सेवानिवृत्ती लाभ न दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ही कठोर कारवाई केली आहे.