राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी.. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा दिवसेंदिवस जोर धरू लागली असतानाच दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम वाढताना दिसतोय. काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विलीनीकरणासंदर्भात सस्पेन्स वाढवणार उत्तर दिलं. त्यानंतर आज सुप्रिया सुळेंनी विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत संपूर्ण चर्चा फेटाळून लावल्यात. अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पड़दा टाकल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. त्यामुळे दोन पक्षांमध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर नेमकं चाललंय. का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.