आमदार संजय गायकवाड यांच्या 'तीन कोटी आणि शंभर बोकड' या विधानावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला. 'ज्याला जशी सवय, तशी वक्तव्य' असं म्हणत त्यांनी 'खोके आणि बोक्यां'वरून गायकवाडांना टोमणा मारला. निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल, असेही ते म्हणाले.