देवळी येथे एका अज्ञाताने इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या गळ्यात शिवसेनेचा झेंडा बांधल्याने वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुतळा स्वच्छ करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.