राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त २७ सप्टेंबर रोजी नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पथके निघतील आणि व्हेरायटी चौकात एकत्र येतील. सरसंघचालक या पथसंचलनाचे अवलोकन करणार आहेत. हे पथसंचलन संघाच्या शक्तीप्रदर्शनासारखे असेल.