राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चांना उधाण आलंय. अशा परिस्थितीत संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसोबत असलेल्या संबंधांवरुन राज्यभर रान उठवणाऱ्या अंजली दमानियांनी मुंडेंना अल्टीमेटम दिलाय.