Nagpur ग्रामीण RTO मध्ये 1500 ते 2000 चोरीच्या ट्रक्सची अवैध नोंदणी? अधिकाऱ्यांच्या सहभागाचाही संशय

नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये मोठ्या वाहन घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या काही वर्षांत सुमारे दीड ते दोन हजार चोरीच्या ट्रकांची अवैध नोंदणी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 400 ट्रकांची नोंदणी रद्द करण्यात आली असून आणखी अनेक वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. चोरीचे ट्रक अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि काही प्रकरणांमध्ये लक्षद्वीपमध्ये नोंदणी करून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरटीओ अधिकाऱ्यांच्याही सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.

संबंधित व्हिडीओ