जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्गात घट करण्यात आली... सद्यस्थितीत हतनुर धरणाच्या 14 दरवाज्यातून 74 हजार 727 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू आहे... जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश व विदर्भात पावसाने उसंत घेतल्याने धरणात पाण्याची आवक काही प्रमाणात घटल्यामुळे धरणातून पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे..