गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील विश्वमित्र नदीला पूर आला असून मळसुर, झरंडी परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यादरम्यान, गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठा पूर असल्याचे सांगितले जाते. या पुरामुळे शेकडो एकरवरील सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दोन दिवस उलटूनही तलाठी व संबंधित अधिकारी आलेले नाहीत, की सर्वेक्षण होणार असल्याची माहितीही मिळालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी