सांगलीच्या कृष्णाचे पातळी 35.5 फुटावर आहे.अवघ्या दीड तासांत दीड फुटाने पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 47 कुटुंब स्थलांतरित झाले आहेत तब्बल 487 लोकांचा यामध्ये सहभाग आहे आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरी घरांमध्येही पाणी शिरले आहे. संध्याकाळपर्यंत आणखी पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे.याचाच आढावा घेतला आहे आम्हचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी. सांगलीत कृष्णा नदी मध्ये पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णा नदीत तरुणांचा उडीचा थरार पाहायला मिळत आहे.. दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगली कर घेत आहेत.. आज ही तो थरार आनुभवायस मिळाला.. सांगली आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी साडे पस्तीस फुटावर आल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर, गठ्ठा मारून थरार निर्माण केला आहे.