मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी ‘उत्कर्ष पॅनेल’ या नावाने एकत्र निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. मात्र, या निवडणुकीचा निकाल दोन्ही ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक ठरला. ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळाली नाही. तर या निवडणुकीत, ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे.. तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत.या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केलीय..